PLZ SUBSCRIBE NEWS CHANNEL HINDUSTAN NEWS NOE https://www.youtube.com/ channel/ UCDsH7S3IT4Q9EUxnTu4zoqQ
हिंदुस्तान न्यूज़ नाउ
अहमदनगर जिल्ह्यातील कलाकारांच्या विविध प्रश्नावर चर्च करण्यासाठी व कलाकारांना मदत व्हावी यासाठी काँग्रेसच्या कला आणि सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र राज्य कमिटीने रविवारी 27 मार्च la अहमदनगर chya लाल टाकी येथील काँग्रेस भुवन येथे जिल्ह्यातील सर्व कलाकारांचा मेळावा आयोजित केला असून यात, लोक कला, गायन, वादन, शाहीर, लेखक, कवी,साहित्यिक,नाटक तसेच सिनेमा आणि मालिकेतील सर्व कलाकार भाग घेऊ शकतात. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील या सर्व कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस chya कला आणि सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व कलाकारांना एका छत्राखाली आणून त्यांच्या रास्त मागण्यांसाठी मंत्री स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्याचे आयोजन करण्याचा सूचना कला आणि सांस्कृतिक विभागा chya प्रदेश अध्यक्षा विद्याताई कदम यांनी दिल्या असून नगर शहर congres che अध्यक्ष किरण काळे आणि प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या कार्यक्रमात प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा होणार आहे.१) जिल्हास्तरीय वृध्द कलावांत मानधन कमिटी वर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचा जिल्हाध्यक्ष कायम सदस्य नियुक्ती करण्यात यावा. २) परीक्षक म्हणून कलाकारांची २५ प्रयोगाची अट शिथिल करून ५ प्रयोग करण्यात यावी.
३) ग्रामीण शहरी व पारंपरिक कलाकारांचे सर्वेक्षण करून त्याच्या उन्नती साठी महारष्ट्र शासनाने धोरण निश्चित करावे.
४) प्रदेश , जिल्हा , तालुका स्तरावर सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचे कलाकारांना प्राधान्याने संधी देणे बाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच वर्षानुवर्षं कायम असलेले परीक्षक हटवण्यात यावे व नवीन परिक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश समित्यांवर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात यावेत.
५) प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक विभागाच्या वतीने कला भवन बांधण्यात यावेत व नवोदित कलाकारांना सराव व प्रयोग करण्यासाठी मोफत देण्यात यावेत या कला भवणची मालकी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग गांधी घराण्याची काँग्रेस असलेल्या पदाधिकारी यांचे कडेच राहील
तसेच ग्रामीण शहरी आदिवासी पारंपरिक कलावंत तसेच रंग कर्मी नाट्य कलाकार ,गायक ,वादक यांना राज्यशासनाचे ओळख पत्र देण्यात यावे जेणे करून कार्यक्रमानंतर घरी जात असताना पोलिसांचा त्रास होनार नाही. या कार्यक्रमासाठी प्रदेश adhyakshaa विद्याताई कदम, प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष तथा maharastra समन्वयक सम्राट साळवी, प्रदेश कार्याध्यक्ष फर्जना इक्बाल, प्रदेश कार्याध्यक्ष तथा राजकीय सल्लागार खालील सय्यद, प्रदेश सचिव चंद्रशेखर कडू पाटील, काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके,काँग्रेस चे शहर अध्यक्ष, किरण काळे, कला आणि सांस्कृतिक चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रेवणनाथ देशमुख, नगर शहर अध्यक्ष चंदनशिवे सर, आमदार लहू कानडे, काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफरे, अनुसूचित विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
PLZ SUBSCRIBE NEWS CHANNEL HINDUSTAN NEWS NOE https://www.youtube.com/ channel/ UCDsH7S3IT4Q9EUxnTu4zoqQ हिंदुस्तान न्यूज़ नाउ And न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI 9927141966) Contact us for news or articles