Breaking News
Home / Latest News / स्वावलंबी बनून स्वतःच्या हिमतीवर पुरुषांच्या बरोबरीने स्वतःला सिद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

स्वावलंबी बनून स्वतःच्या हिमतीवर पुरुषांच्या बरोबरीने स्वतःला सिद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान


काळाच्या ओघानुसार आता स्त्री आणि पुरुष यांच्यात सध्याच्या परिस्थितीत सर्वच बाबींमध्ये समानता येत चालली आहे.आजच्या स्त्रीची ताकद प्रचंड वाढलेली आहे. आजची स्त्री शिक्षण घेते शिक्षण देते विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसायही करते आणि घराची जबाबदारी उचलते मुलांचा अभ्यास मुलांच्या भवितव्याची जडण-घडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे.
 एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. या सामर्थ्याने आणि स्वावलंबनाने आत्मनिर्भर होत आजच्या स्त्रीने  समाजामध्ये तिचे स्थान कसे अनन्य साधारण महत्त्वाचे आहे हे संपूर्ण समाजाला दाखवून आणि पटवूनही दिले आहे.
आज समाजामध्ये वावरताना अनेक स्त्रिया आपल्याला दिसतील ज्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आले की त्यांना काही कारणास्तव आपल्या पतीचा सहवास सोडावा लागला किंवा काही कारणांनी तो सुटला, आणि त्यांना हे आयुष्य स्वतः पुढे सावराव लागलं.
 आज समाजामध्ये विविध क्षेत्रात अर्थात डॉक्टर असो वकील असो शाँपकीपर असो मोठ्या ऑफिसर असो स्वच्छता दूत असो कलेक्टर असो अशा अनेक ठिकाणी महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत त्यामुळे महिला कुठेही कमी नाहीत हेच सिद्ध होते.
समाजात अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत की ज्या अशा प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड देत स्वतःच्या पायावर उभ्या राहून, पुरुषांच्या बरोबरीने आपला संसार सांभाळत समाजामध्ये नावलौकिक प्राप्त करत आहेत.
 समाजातील अशा कर्तुत्ववान स्त्रियांनी केलेल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना…..
 सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रितु लोखंडे आणि गुरमित मान यांनी केले, हा कार्यक्रम रविवार दिनांक
20/032022 रोजी
 *बेटी बचाव बेटी पढाव* चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
*बेटी बचाव बेटी पढाव* चे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. रितू लोखंडे आणि डॉ. मधु राव यांनी केले. डॉ. रितू लोखंडे या स्वतः रेडिओलोजिस्ट असुन त्यांनी *बेटी बचाव बेटी पढाव* या चळवळी मधे स्वतः ला वाहुन घेतले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. आसमा शेख, मा. भगवान वैराट, मा. अतुल गोडबोले, डॉ. अजय दुबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम जे झेड लेक व्हीव्यू
भूगांव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 37वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.
PLZ SUBSCRIBE NEWS CHANNEL HINDUSTAN NEWS NOE  https://www.youtube.com/channel/UCDsH7S3IT4Q9EUxnTu4zoqQ   हिंदुस्तान न्यूज़ नाउ And न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI 9927141966) Contact us for news or articles

About Rihan Ansari

Check Also

युवा कांग्रेस के नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष अभिनव का हुआ जोरदार स्वागत

🔊 पोस्ट को सुनें युवा कांग्रेस के नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष अभिनव का हुआ जोरदार स्वागत …

Leave a Reply

Your email address will not be published.