Breaking News
Home / Latest News / माणूस आणि माणसाची इच्छा – तुमची सखी भारती

माणूस आणि माणसाची इच्छा – तुमची सखी भारती


माणूस आणि माणसाची इच्छा
माणूस म्हणजे कोण हा प्रश्‍न सगळयांना पडत नाही पण काही असे असतात जे सखोल विचार करणारे असतात त्यांना असे प्रश्‍न नेहमी सतावतात पडतात कारण ते इश्‍वराचे प्रिय असतात आर्इच्या गर्भात ते सगळं काही एैकत असतात आर्इ नऊ महिने बाळाला पोटात सांभाळते तसं बघाला गेलो तर देव त्या जीवाला सांभाळतो जेव्हा माणूस मरतो तेव्हा आत्मा देवात लीन होतो असं म्हणतात खर तर तो भटकत असतो त्याच्या कर्माचा लेखाजोखा करून देव त्याला आर्इच्या उदरात असलेल्या गर्भात पाठवतो आत्मा जेव्हा जातो गर्भात तेव्हा तो इश्‍वराला वचन देतो की मला तू मनुष्य रूपी जन्मात पाठवलं तर मी तुझं कार्य नक्की करेन पण नंतर तो विसरतो या मायाजाळ रूपी संसारात तो हरवून जातो तो हे ही विसरतो की मी कोण आहे.कुठुन आलो कशासाठी आलो आणि कुठे जायचंय मग जीवनात तो सुख आणि दुःख दोन्ही अनुभवत असतो जो व्यक्ती लहानपणापासून मेहनत करत असतो त्याचं फळ इश्‍वर देतो पण खुप काळ उशिराने आणि त्याच्या परिक्षेत पास झाल्यावर तो देतो.
  माणुस सुखात असतो तेव्हा त्याला कसली चिंता नसते.तो खुप खुश असतो आनंदी असतो संगळे उपभोग घेत असतो पण स्वतःला विसरतो आणि याउलट जेव्हा दुख येते तेव्हा तो हरतो उदास होतो सगळी इच्छा आकांक्षा मारतो आणि संसारातून विभक्त होऊन राहतोप तो एकटा राहतो व विचार करतो काय केले मी जे असं माझ्यासोबत घडलं मी कुठे चुकलो की असे देवाने माझ्याबरोबर असं का केला.कुठल्या जन्माचं पाप मी फेडली असे त्याला वाटायाला लागते याला म्हणतात           म्हणजे       दुःख काही करण्याचं मन नसणं या उलट असते ती           म्हणजे माणुस आनंदी असतो खुष स्फृती असते बरेच गोष्टी करण्याची इच्छा असते या जगात या दोन एनर्जीचे लोक असतात ते आपल्यावर डिपेन्ड असते की आपण कोणासोबत राहतो जर नेगेटीव्ह लोकांत राहतो तर मन तसेच विचार करायला लागते आणि मन जेव्हा तसा विचार करायला लागते तेव्हा जीव वार्इट व्यक्तीना आकृष्ट करत असतो सोपं उदाहरण घेतलं तर तुम्ही एखादया अशा व्यक्तीला भेटला जी तुम्हाला हीन किंवा तुच्छ  ठरवते आणि तसं बोलते कि तुझ्याकडून काही होणार नाही तू ही गोष्ट सोडन दे तेव्हा मन उदास होणं आणि तसे नेगेटिव्ह विचार करायला लागतं अशा वेळी माणसाने जे आपल्याला आवडते त्या गोष्टी करायाला पाहिजे ज्यांने नेगेटिव्हीटी दुर होऊन आपण पॉजिटिव्ह होऊ शकतो उदा.एखादयाला संगीत आवडते ते ऐकला की मन उदासी दूर होऊन आनंदाने नाचायला लागते आणि असं मन बरच काही करू शकते किंवा जर आपले छंद असतील ज्यातुन आपल्याला काहीतरी पॉजिनेसेस मिळेल असं जोपावं आणि ते त्या वेळी करावं हे ही जमत नसेल तर एखादया अशा व्यक्तीला भेटावे किंवा बोलावे ज्यात राहुन तुम्हाला पॉजिटिव्ह वाटेल किंवा पॉजिटिव्हीटी जाणवेल.आजकाल तर भरपूर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत ज्यात आपण हे नक्कीच करू शकतो कधी विचार केला का आपण सोशल मिडीयाचा वापर उत्तमरित्या कसा करू शकतो कोणाला हिणवण्यापेक्षा कोणाची डुप्लीकेट प्रोफार्इल बनवून प्रसिध्दी पेक्षा किंवा त्याची बदनामी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्ती महत्वाला  डेव्हलप करण्यासाठी करू शकतो पसर्नलिटी डेव्हलपमेन्ट कशाला म्हणतात यालाच तर म्हणतात स्वतःचा विचार करून स्वतः  उत्तमरित्या जगाला कसं दाखवून देऊ आम्ही सगळयातले नाही आम्ही  युनिकिव्ह आहोत आमच्यासारखा शोधून सापडणार नाही हे आपण करू शकतो असे बरेच तत्व आहे मानवात की माणूस ठरवलं तर सगळं काही करू शकतो कधी विचार केला की एखादा व्यक्ती लेखक कवी डॉक्टर अ‍ॅक्टर सिंगर कसा बनतो यावर नक्की विचार करा उत्तर नक्की सापडले की काय करायचं आयुष्यात कुठवर आपल्याला जायचं मग इच्छा जिद्दीचे रूप घेर्इल आणि जे ठरवाल ते होर्इल असं बरेच अनुभव आहेत ते जाणण्यासाठीच नक्की संपर्क करा बाकी दुसया लेखात लिहीणारच  यापुढची स्टेज किंवा कसं करू यावर चला मग माझ्या मित्र मैत्रिणींनो आता इथला पुढचा संवादासाठी नक्की वाचा आणि संपर्क साधा
तुमची सखी भारती
PLZ Subscribe RN TODAY NEWS CHANNEL https://www.youtube.com/channel/UC8AN-OqNY6A2VsZckF61m-g न्यूज़ या आर्टिकल व विज्ञापन देने के लिए संपर्क करें (RN TODAY NEWS +919927141966) https://www.youtube.com/channel/UCFS7PmVqRXSD_4CQXaYvx0A  PLZ Subscribe

About Rihan Ansari

Check Also

Alisha Shephali and Jyotsna Rai hit the highest marks in the premium contest and wins Glam Guidance Miss/Mrs India Asia 2024

🔊 पोस्ट को सुनें Alisha Shephali and Jyotsna Rai hit the highest marks in the …

Leave a Reply

Your email address will not be published.