Breaking News
Home / Latest News / करिश्मा माने, भावना गोयल, विकास गिरी व दुर्वा गांधी एलिगंंट आयकॉन महाराष्ट्र २०२१ चे मानकरी. 

करिश्मा माने, भावना गोयल, विकास गिरी व दुर्वा गांधी एलिगंंट आयकॉन महाराष्ट्र २०२१ चे मानकरी. 


ह्या कार्यक्रमाचे आयोजन हे संचालिका आणि आयोजक अंजली जंगम यांनी केले, स्पर्धेत मॅक्स आणि अनुराजिती ब्रँड चे आकर्षक पेहेराव सादर

पुणे- एस अँड ए ट्रेंड्स इवेंट्स अँड प्रोडक्शन च्या वतीने नुकतीच एलिगंंट अँड आयकॉन महाराष्ट्र २०२१ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मधे मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स असे विभाग होते. पारंपारिक आणि पाश्चिमात्य पेहेराव आणि प्रश्नमंजूषा या फेऱ्यांबरोबरच स्पर्धकांची चाल, आत्मविश्वास, स्वपरिचय या गुणांच्या आधारावर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले. श्रीयुत गटात विकास गिरी, कुमारी गटात करिष्मा माने, श्रीमती गटात भावना गोयल तर बाल गटात दुर्वा गांधी यांनी प्रथम विजेते पटकावले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
याच कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ग्लोबल वंडर आयकॉनिक महाराष्ट्र २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मिस्टर वर्ल्ड रोहित खंडेलवाल उपस्थित होता. शोनी विर्दि, स्नेहल रहाणे, पूजा रेड्डी, डॉ. शोएब आणि डॉ रोहित शिंदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे संयोजन मोनिका जैन, दिप्ती शहा,  दिपाली खामर आणि आकाश पांडे यांनी केले…
 तर आयोजन अंजली जंगम यांनी केले होते. सूत्रसंचालन रेवती यांनी केले.
 *ग्लोबल वंडर आयकॉनिक अवॉर्ड महाराष्ट्र २०२१ चे पुरस्कार्थी -*
डॉ. रश्मी वेद,आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट
आणि ट्रायकोलॉजिस्ट, डॉ अपेक्षा, संस्थापक आणि वैद्यकीय सल्लागार, फैसल सिद्दीकी,फॅशन मॉडेल, आशिष कुमार, सामाजिक कार्यकर्ता, स्नेहल रहाणे, सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, पायल पवार,तरुण उद्योजक, सौरभ दसपुते, कोरिओग्राफर, भारती साहू, शिक्षणतज्ज्ञ, विवेक गोंड, व्यावसायिक छायाचित्रकार, पूजा मंडोरा आणि चिराग मंडोरा, व्यावसायिक फॅशन फोटोग्राफर, अ‍ॅन अँथनी, मॉडेलिंग आणि अभिनय, मेघा साळुंके, फॅशन मॉडेल.
 *कार्यक्रमाचे सहभागी प्रायोजक*
वन स्टेज, चांदुकाका सराफ,कलाकर पब्लिक, अनुराजिती, ग्लॅम गिल्ट, मॅक्स, क्लब महिंद्रा, स्किलेट्ज फाउंडेशन, पीएस फोटोग्राफी, एलएनजी, डिजिसेन्स, पुणेकर प्रतु, बी ब्लिस, सिटी गॉसिप, शिवधर्म, अनंत, सत्व, मुंबई ग्लोबल, द बिग फाईव्ह, आरएन टुडे, फॅशनवेव्ह.
PLZ Subscribe RN Today News Channel https://www.youtube.com/channel/UC8AN-OqNY6A2VsZckF61m-g And न्यूज़ या आर्टिकल देने के लिए संपर्क करें (R ANSARI 9927141966) Contact us for news or articles

About Rihan Ansari

Check Also

Is the world too much with me

🔊 पोस्ट को सुनें Is the world too much with me? The world shall consume …

Leave a Reply

Your email address will not be published.

Best WordPress Developer in Lucknow | Best Divorce Lawyer in Lucknow | Best Advocate for Divorce in Lucknow